प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर (Management Council) सदस्य म्हणून नामनिर्देशनाद्वारे निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३०(४)(झ) नुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) प्रफुल्ल पवार यांनी पत्राद्वारे याबाबतची अधिकृत माहिती दिली.

व्यवस्थापन परिषद ही विद्यापीठाच्या प्रशासकीय व धोरणात्मक कामकाजातील महत्त्वाची अधिकार संस्था आहे. संरक्षण व सामरिकशास्त्र या क्षेत्रातील प्रा. डॉ. खरे यांचा दीर्घ अनुभव, शैक्षणिक योगदान आणि प्रशासकीय जाणिवेचा विद्यापीठाच्या कामकाजाला उपयोग होणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ६२(१) नुसार प्रा. डॉ. खरे यांच्या व्यवस्थापन परिषद सदस्यत्वाची मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राहणार आहे.

प्रा. डॉ. विजय खरे यांच्या निवडीबद्दल विद्यापीठ प्रशासन, शिक्षकवर्ग तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या अनुभवाचा विद्यापीठाच्या निर्णयप्रक्रियेत सकारात्मक उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

See also  अगेन्स्ट कॅप प्रवेशातील OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर
  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी पुणे प्रतिनिधी  See Alsoअमरावतीच्या सायलीची जागतिक झेप;  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकाची लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंगसाठी निवडसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!