लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी ; राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि सर्जनशील लेखनाची प्रेरणा जपण्याचा संदेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन ; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी ; राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि सर्जनशील लेखनाची प्रेरणा जपण्याचा संदेश

पुणे, दि. १ ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साहित्यिक, प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचे स्मरण म्हणून त्यांचा जयंतीदिन विद्यापीठात ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या दालनात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रनिर्मिती, समाजजागृती आणि सामाजिक परिवर्तनातील ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. स्वातंत्र्य, सामाजिक समता, श्रमप्रतिष्ठा, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य, शिक्षण आणि लेखन यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या लेखन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील लेखनाची आवड आणि सामाजिक भान अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास अधिष्ठाता प्रा. डॉ. सदानंद बनसोडे, प्रा. डॉ. विलास आढाव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे अध्यासन प्रमुख डॉ. सुनिल भंडगे, जयकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. संजय देसले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘ज्ञानशिल्प’ लोकार्पण सोहळा संपन्न ; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची गाथा आता विद्यार्थ्यांसमोर
  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!