अगेन्स्ट कॅप प्रवेशातील OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर

अगेन्स्टकॅप प्रवेशातील OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : इंजिनिअरिंगसह विविध व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये ‘Against CAP’ अंतर्गत प्रवेश घेतलेल्या OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारच्या २० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकानंतर SC आणि ST विद्यार्थ्यांना सवलत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

‘Against CAP’ ही CAP प्रवेश प्रक्रियेबाहेरील किंवा बेकायदेशीर प्रक्रिया नसून, नियमित CAP फेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीची अधिकृत प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व शुल्क सवलतीचा लाभ मिळेल, या अपेक्षेने प्रवेश घेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांनी नियमित CAPमध्ये मिळालेले महाविद्यालय सोडून पसंतीची शाखा किंवा महाविद्यालय मिळावे म्हणून Against CAP मधून प्रवेश घेतला. यापूर्वी MahaDBT पोर्टलवर अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले गेले असून काही विद्यार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी मिळून शिष्यवृत्तीची रक्कमही वितरित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अचानक शिष्यवृत्तीच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाप्रमाणे संपूर्ण शुल्क भरण्याचा दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शुल्क न भरल्यास पुढील प्रवेश, परीक्षा अर्ज, गुणपत्रिका किंवा इतर शैक्षणिक प्रक्रिया रोखण्याची भीती विद्यार्थ्यांना असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) इतर मागास बहुजन विकास विभागाकडे निवेदन देऊन OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना Against CAP अंतर्गत शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ पूर्ववत देण्याची मागणी केली आहे.

तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून खुल्या प्रवर्गाप्रमाणे संपूर्ण शुल्क वसूल करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. MahaDBT पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढून पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरित करावी आणि २०२५-२६ मध्ये Against CAP मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही लाभ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

See also  ओबीसी समाजाच्या मोठ्या जनआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज पुण्यात तातडीची बैठक

याशिवाय, चालू शैक्षणिक वर्षात Against CAP मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना आणि स्वतंत्र परिपत्रक जारी करावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे.

ABVPच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य निकिता डिंबर, प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के, प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन विकास विभागाच्या संचालक मुळे यांची भेट घेऊन निवेदन साद केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने स्पष्ट निर्णय घेऊन OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!