महात्मा फुले समग्र वाड:मय प्रकाशनाला मुहुर्तच नाही; तर ५० रुपयात ग्रंथ देण्याचे उच्च शिक्षण मंत्र्यांचे आश्र्वासन निष्फळ! १७ सप्टेंबर पासुन,पुण्यात उच्च शिक्षण संचालनालयासमोर होणार उपोषण

महात्मा फुले समग्र वाड:मय प्रकाशनाला मुहुर्तच नाही; तर ५० रुपयात ग्रंथ देण्याचे उच्च शिक्षण मंत्र्यांचे आश्र्वासन निष्फळ

ग्रंथनिर्मितीसाठी व किफायत किंमतीसाठी १७ सप्टेंबर पासुन,पुण्यात उच्च शिक्षण संचालनालयासमोर होणार उपोषण

पुणे|प्रतिनिधी

महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या महान विचारांचा, सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा आणि सत्यशोधक विचारधारेचा अधिकाधिक प्रसार होणे आवश्यक आहे. महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता, स्त्री-मुक्ती, शोषित-वंचित घटकांचे सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे पर्व आहे.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या साहित्याचे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि तरुणाई यांना सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महात्मा फुले समग्र वाङ्मय तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय हे दोन्ही ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत.

महात्मा ज्योतीबा फुले यांचे जन्मव्दिशताब्दी वर्ष राज्य सरकार व केंद्र सरकार सुध्दा साजरे करीत असतांना,महात्मा फुले यांची कर्मभुमि असलेल्या महाराष्ट्र राज्यात या महान महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे शासकीय समग्र वाड:मय कुठेही उपलब्ध नाही. राज्य शासनाच्या उच्च व शिक्षण विभागाचे वतीने,हे समग्र वाड:मय छापण्याची व किफायत किंमतीत ते सर्वत्र वितरित करण्याची जबाबदारी शासनाची व संबंधित समितीची आहे.

या बाबत हे महान ग्रंथ शासनाच्या विभागाने छापुन ते काफायत किंमतीत द्यावे, यासाठी राज्याचे जेष्ठ मंत्री मा. ना.श्री. छगनराव भुजबळ यांनी मागील तीन वर्षापासुन, राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणविस व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटुन व लेखी पत्र देवुन मागणी केली होती, व सातत्याने पाठपुरावा सुध्दा केला आहे.

याच संदर्भात ओबीसी आंदोलक व चळवळीचे अभ्यासक प्रा. दिवाकर गमे यांनी हीच मागणी करून,११ मार्च २०२५ ला पुणे येथील संचालक उच्च शिक्षण यांचे कार्यालयासमोर उपोषण केले होते,त्यावेळी हे ग्रंथ छापण्यात येवुन, ते किफायत किंमतीत वितरित केले जाईल , असे शासनाचे वतीने आश्र्वासन देवुन, उपोषण संपविले होते

राज्याचे जेष्ठ मंत्री मा. ना. श्री. छगनराव भुजबळ साहेब यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे, शेवटी महात्मा फुले यांच्या जयंतीला ११ एप्रिल २०२५ ला महात्मा फुले वाड्यात, महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या साक्षीने,महात्मा फुले समग्र वाड:मय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाड: मय पुनर्मुद्रण प्रकाशनाचा कार्यक्रम, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व राज्याचे जेष्ठ मंत्री मा. ना. श्री. छगनराव भुजबळ यांचे उपस्थीतीत, संचालक उच्च शिक्षण,कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणमान्य व्यक्ती व हजारो फुलेप्रेमी नागरीकांसमोर पार पाडला.

त्यावेळी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा फुले समग्र वाड:मय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाड:मय हे उच्च शिक्षण विभागाचे वतीने पुरेशा संखेत छापण्यात येवुन, या ग्रंथांची प्रत्येकी किंमत फक्त ५० रूपये एवढी ठेवुन ते राज्यात सर्वत्र वितरित करण्यात येईल. व यासाठी आवश्यक शासन निर्णय काढण्यात येईल व तसा प्रस्ताव संचालक उच्च शिक्षण यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवावा, असे त्याच वेळी निर्देश दिले. याच कार्यक्रमात केवळ प्रत्येकी हजार प्रति त्यावेळी ५० रूपयात वितरित करण्यात आल्यात. सर्वांनी उच्च शिक्षण मंत्र्यांच्या या घोषणेचे जोरदार स्वागत केले.

पण त्यानंतर मात्र शासनाकडुन ना ग्रंथ छापल्या गेले किंवा ५० रूपये किंमतीचा शासन निर्णयही काढण्यात आलेला नाही.उच्च शिक्षण संचालक डाॅ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शासनाला निर्देशाप्रमाणे दिनांक 26.4.2025 व दिनांक 28.8.2025 ला ग्रंथ प्रति छापणे व किंमत ५० रूपये ठेवणे याबाबत रितसर प्रस्ताव पाठविले. या संदर्भात आंदोलक प्रा. दिवाकर गमे यांनी मंत्रालयात प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्ढी उच्च व तंत्र शिक्षण यांची अनेकदा भेट घेवुन हे महान ग्रंथ छापण्याची व त्याची किंमत कमी करण्याचा शासन निर्णय काढण्याची विनंती केली. पण शेवटी त्याला केराची टोपलीच दाखविण्यात आली.

आज राज्यात महात्मा फुले यांचे जन्मव्दिशताब्दी वर्ष साजरे होत आहे.परंतु महात्मा फुले यांची कर्मभुमि असलेल्या महाराष्ट्रात उच्च शिक्षण मंत्री यांनी भर सभेत, महात्मा फुले वाड्यात, महात्मा फुले स्मारकाच्या साक्षीने आश्र्वासन देवूनही,या महान ग्रंथांच्या शासकीय प्रति उपलब्ध नसणे व त्याची किंमत सुध्दा कमी न करणे, ही शिव फुले शाहु आंबेडकर म्हणविणार्‍या महाराष्ट्राची शोकांतीका आहे.

शेवटी सर्व निवेदने, विनंती पत्रे,मागणी पत्रे यांचे पर्याय संपल्यामुळे,महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाड:मय यांच्या प्रत्येकी ५० हजार प्रति छापण्यात याव्यात, व मंत्री महोदयांनी आश्र्वासन दिल्याप्रमाणे त्या प्रत्येकी ५० रूपये या किफायती किंमतीत वितरीत करण्यात याव्यात या मागणीसाठी,ओबीसी आंदोलक प्रा. दिवाकर गमे यांनी प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण व संचालक उच्च शिक्षण पुणे यांना उपोषणाची सुचना दिली आहे. पुण्याच्या शिवाजी नगर मधील उच्च शिक्षण विभागाच्या संचालनालयासमोर, ओबीसी आंदोलक प्रा. दिवाकर गमे या मागण्यासाठी १७ सप्टेंबर पासुन उपोषण करणार आहेत.

See also  महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची नियुक्ती; आंदोलनाला मोठे यश
  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!