सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप परिसराचे नामांतर होणार नाहीच; मंत्री छगनराव भुजबळ यांची जाहीर सभेतील मागणी मुख्यमंत्र्यांनी केली तात्काळ मान्य
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक परिसर प्रशासकीय इमारत उद्घाटन सोहळा संपन्न ; मुख्यमंत्री , मंत्री यांचेसह अनेक दिग्गज नेते, कुलगुरू आणि विद्यापीठ विदयार्थी पालक यांचेसह नागरिकांची प्रचंड उत्साहात उपस्थिती
नाशिक |प्रतिनिधी
नाशिक हे अत्यंत वेगाने वाढणारे उद्योग प्रधान महानगर आहे. प्राचीन काळापासून या नाशिकला जशी प्राचीन इतिहास व धर्म परंपरेची ओळख आहे, तसेच हे नाशिक आता शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर विस्तार करीत असून शिक्षणाचे अद्यावत संकुल बनत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,मराठा विद्या प्रसारक मंडळ च्या विविध शिक्षण संस्था, तसेच मेट ची भुजबळ नॉलेज सिटी ही नाशिकची शिक्षण क्षेत्रातील मानाची ओळख निर्माण करणारी आहे. अशा या नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपमुख्यालय असावे अशी विद्यार्थी व पालकांची मागणी होती. त्याला नाशिक जिल्ह्याचे व राज्याचे जेष्ठ मंत्री मा. ना. श्री छगनराव भुजबळ यांची साथ लाभली. भुजबळ साहेबांच्या प्रयत्नमधून नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपमुख्यालय सुरु झाले. परंतु नाशिक येथे प्रत्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रशासकीय इमारत स्वतंत्रपणे निर्माण होत नाही, तो पर्यंत विद्यापीठ व परिसरातील संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणारच नव्हता.
ही अडचण ओळखून राज्याचे जेष्ठ मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळेच , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकार्यालयासाठी, दिंडोरी जवळील शिवनई येथे ६३ एकर जागा मिळविण्यात आली. व त्या ठिकाणीच परिसरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक कॅम्पस साकार झाले.हे सारे प्रयत्न मा. भुजबळ साहेबांनी केल्यामुळेच आज हे विद्यापीठाचे नाशिक कॅम्पस साकार झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, राज्याचे जेष्ठ मंत्री श्री छगनराव भुजबळ, तसेच पुण्याचे पालक मंत्री श्री गिरीश महाजन, राज्याचे मंत्री, यांचे उपस्थितीत या भव्य आणि अत्याधुनिक उप परिसर प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
या समारंभात बोलतांना मा. ना. श्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, यापुढे,नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच प्रशासकीय आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हे कॅम्पस सुरू करण्यात आले आहे. नाशिक आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे कॅम्पस उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. हे स्वतंत्र आणि सक्षम कॅम्पस अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून, नाशिकच्या शैक्षणिक विकासाच्या एका नव्या पर्वाचा शुभारंभ असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
यापुढे बोलतांना मा. छगनराव भुजबळ म्हणाले,*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपपरिसराचे नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची खंत यावेळी व्यक्त केली.* ज्या ज्ञानज्योती सावित्रीबाईंनी वंचित घटकांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांचे नाव बदलण्यात येऊ नये. इतर विद्यापीठांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. फुले दांपत्याचे जे कार्यक्षेत्र होते, त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यानंतर हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यात कुठलाही बदल केला जाऊ नये, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मा. ना. श्री. छगनराव भुजबळ यांनी केली. हे नाव बदलले जाणार नाही अशी निःसंदिग्ध ग्वाही मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच सभेत दिल्यामुळे त्यांचे आभार सुद्धा भुजबळ साहेबांनी मानले. व अशा प्रकारे मा. भुजबळ साहेबांच्या परखड व स्पष्टवक्ते पणामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पस परिसराच्या नामांतराचा विषय कायमचा संपविला गेला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या उपकेंद्रासाठी विविध प्रशासकीय प्रक्रिया आणि अडचणींनंतर २०१४ मध्ये शिवनई येथे या उपकेंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने मा. भुजबळ साहेबांनी पाठपुरावा करून या कामाला गती देण्याचे काम केले. १७ जून २०२२ रोजी या कॅम्पसचे भूमिपूजन करण्याचे भाग्य भुजबळ साहेब यांना लाभले, त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात करून, या उपकेंद्रासाठी जमीन देणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे सुद्धा यावेळी मा. भुजबळ यांनी आभार मानले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन,शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, खासदार भास्करराव भगरे, आमदार गोकुळ गीते,कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी,प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रफुल्ल पवार, विद्यापीठाचे सिनेट सदस्य सागर वैद्य यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते.