निनावी पत्राने खळबळ ; पुणे विद्यापीठामध्ये IT विभागात लाखो रूपयांचा आर्थिक घोटाळा ? निनावी पत्रातून इलेक्ट्रिक साहित्य, सीसीटीव्ही आणि फायबर केबलच्या कामांवर गंभीर आरोप

निनावी पत्राने खळबळ ; पुणे विद्यापीठामध्ये IT विभागात लाखों रुपयांचा  आर्थिक घोटाळा ?

निनावी पत्रातून इलेक्ट्रिक साहित्य, सीसीटीव्ही आणि फायबर केबलच्या कामांवर गंभीर आरोप

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध इलेक्ट्रिक वस्तू व उपकरणांच्या खरेदीसह सीसीटीव्ही आणि फायबर ऑप्टिकल केबलच्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचे आरोप करणारे एक निनावी पत्र काही व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच विद्यापीठातील प्रमुख अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रातील आरोपांवर अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अथवा कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

विद्यापीठ परिसरात बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांजवळील काही कॅमेरेही बंद असल्याचे नमूद करताना, कंत्राटदाराला हाताशी धरून जुने कॅमेरे नवीन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय फायबर ऑप्टिकल केबल दुरुस्तीच्या कामातही कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. तांत्रिक समितीची दिशाभूल करून हा प्रकल्प राबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. काही ठिकाणी केबल टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले, मात्र प्रत्यक्षात जुनीच केबल पुरण्यात आली किंवा केबलची जोडणी अद्याप करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गरज नसतानाही मोठी रक्कम मिळविण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प विद्यापीठावर लादण्यात आल्याचा गंभीर आरोप पत्रात आहे. विशेष म्हणजे, या कामानंतरही विद्यापीठातील इंटरनेट आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या कायम असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

फायबर केबलची लांबी, प्रकार, संबंधित साहित्याची बाजारातील किंमत आणि इतर तांत्रिक बाबींचा विचार करता या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असल्याचा दावा पत्रलेखकाने केला आहे. काही विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा कथित गैरव्यवहार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

See also  महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची तातडीने नियुक्ती करा; २० ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा

दरम्यान, संबंधित व्यक्तीने कंत्राटदारांकडून परदेश दौरे, देशांतर्गत सहली, परदेशी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाची फी तसेच भेटवस्तूंच्या स्वरूपात कथित लाभ घेतल्याचा आरोपही या निनावी पत्रात करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व आरोप निनावी पत्रातील असून त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

या पत्राची प्रत काही व्यवस्थापन परिषद सदस्यांसह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन या आरोपांची चौकशी करणार का, संबंधित कामांचे तांत्रिक व आर्थिक ऑडिट केले जाणार का आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाणार का, याकडे आता विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading Viewer...

  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!