इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; वेळापत्रक जाहीर
पुणे, दि. ६ ऑगस्ट :
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
संचालनालयाच्या सूचनेनुसार, प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्तेनुसार राबविण्यात येणार असून संबंधित विभागांनी या वेळापत्रकाची व्यापक प्रसिद्धी करावी, तसेच सर्व शासकीय वसतिगृहांनी प्रवेश प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (सन २०२६-२७)
- ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी ७ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६
- अर्ज छाननी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२६
- पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध ८ सप्टेंबर २०२६
- पहिल्या यादीतील प्रवेशाची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२६
- दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध २२ सप्टेंबर २०२६
- दुसऱ्या यादीतील प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६
विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी लिंक
वरील या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.






