सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाची महात्मा फुले अध्यासन सुरु करण्यास टाळाटाळ.

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाची महात्मा फुले अध्यासन सुरु करण्यास टाळाटाळ

उच्चशिक्षण संचालक व शासनाच्या निर्देशांनाही केराची टोपली,

अखेर विद्यार्थी संघटना व ओबीसी आंदोलंकाकडून 20 ऑगस्ट पासून होणार विद्यापीठात उपोषण

पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मागील अनेक वर्षांपासून, महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन सुरु होते, परंतू मागील दोन वर्षांपासून

पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने कोणतेही करण न देता हे अध्यासन बंद पाडले, व अध्यासनाची वास्तू व पुस्तकांसहित सर्व साधन सामुग्री अडगाळीत टाकली.

 देशात व राज्यात महात्मा फुले यांचे हे 200 वे जन्म शताब्दी वर्ष केंद्र व महाराष्ट्र शासनाचे वतीने साजरे केले जात आहे, असे असतांना क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कर्मभूमीत त्यांच्याच विचाराचे व ज्ञानाचे अध्यासन सावित्रीबाई फुले विद्यापीठानेच अडगळीत टाकावे, यासारखे शिव फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव नाही.

या बाबत जुलै 2025 ला विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महात्मा फुले अध्यासन सुरु करावे अशी विनंती करून त्या वेळी निवेदन दिले. त्यावर कारवाई करून अध्यासन प्रमुख नियुक्तीची जाहिरात सुद्धा काढली. तसें लेखी पत्र दिले, पण त्यानंतर वर्षभरात ना नियुक्ती केली, ना महात्मा फुले अध्यसन अडगाळीतुन बाहेर काढून सुरु केले.

 त्यामुळे या महात्मा फुले यांच्या 200 व्या जन्म शताब्दी वर्षात तरी हे अध्यासन सुरु करावे असे मा. प्रफुल्ल पवार कुलसचिव पुणे विद्यापीठ यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेचमा. पराग काळकर प्र. कुलगुरू यांची भेट घेऊनही त्यांना विनंती केली. याच संदर्भात मा. शैलेंद्र देवळानकार संचालक उच्च शिक्षण पुणे यांनी सुद्धा विद्यापीठाला पत्र देऊन, हे महात्मा फुले अध्यासन सुरु कारण्याबाबतचा कार्य अहवाल सदर करून कार्यवाही करावी असे निर्देश दिले. शासनाचे उच्च शिक्षण मंत्री यांनी सुद्धा या बाबत निर्देश दिले.

See also  प्रा. हरि नरके यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त: पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ पुस्तकाचे प्रकाशन

पण या सर्व शासकीय निर्देशांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने केराची टोपली दाखवून, कुठलीही कार्यवाही केली नाही. किंवा त्याबाबत कळविले नाही. महात्मा फुले याच्या 200 व्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्याच कर्मभूमीत पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात अडागळीत आणि उपेक्षितच राहिले.त्या मुळे शेवटचा पर्याय म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, महात्मा फुले अध्यासन नियमाप्रमाणे सुरु करावे, या मागणीसाठी, ओबीसी आंदोलक, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, हे 20 ऑगस्ट2026 पासून पुणे विद्यापीठात, उपोषण करणार आहे.या उपोषनाला NSUI व विद्यापीठातील विद्यार्थी संघटना यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे.

  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!