विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च करूनही ‘वाय-फाय’ बंद; निष्क्रिय आयटी सेलवर कारवाईची मागणी

विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च करूनही ‘वाय-फाय’ बंद; निष्क्रिय आयटी सेलवर कारवाईची मागणी

पुणे, दि. २३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थ्यांसाठीची वाय-फाय (Wi-Fi) सुविधा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद (A) कडून करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या डिजिटल सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना विद्यार्थ्यांना मूलभूत इंटरनेट सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुरज श्रीराम गायकवाड यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यापीठातील वाय-फाय सुविधा तसेच इंटरनेट सेवा गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडल्याने विद्यार्थ्यांना संशोधन, शोधप्रबंध (Research Papers), ऑनलाइन फॉर्म आणि इतर तांत्रिक शैक्षणिक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोट्यवधींचा खर्च नेमका कुठे?’

विद्यापीठ प्रशासन दरवर्षी इंटरनेट आणि डिजिटल पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्कातून आणि करदात्यांच्या पैशातून खर्च होत असताना प्रत्यक्षात इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नसेल, तर या खर्चाची सखोल आर्थिक व प्रशासकीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, वाय-फाय व इंटरनेट सुविधा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या आयटी सेलच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आयटी सेलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन व बीआयपी सुविधा दिल्या जात असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाच्या काळात ही यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निष्क्रिय आयटी सेल बंद करून सक्षम विभागाकडे जबाबदारी द्यावी

आयटी सेलची कार्यक्षमता तपासून तो निष्क्रिय आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गरज भासल्यास आयटी सेलची जबाबदारी कॉम्प्युटर सायन्स किंवा अन्य सक्षम तांत्रिक विभागाकडे सोपवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठ परिसरातील वाय-फाय व इंटरनेट सुविधा तातडीने, शक्यतो ४८ तासांत सुरू करावी; तसेच आयटी सेलच्या कामकाजाची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करावी,

–सुरज गायकवाड, शहराध्यक्ष , रीपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, पुणे

See also  आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी
  • Related Posts

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग महाज्योतीचे प्रादेशिक कार्यालय, वसतिगृह, ग्रंथालयासह भव्य संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : पुण्यातील शिवाजीनगर-वाकडेवाडी…

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना जळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसोबतच त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता, प्रतिभा आणि जिद्दीला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी NSUI जळगाव जिल्ह्याच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    Against  Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

    Against  Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

    विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

    विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

    MPSC विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार / MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; राहुल गांधी ही उपस्थित राहण्याची शक्यता

    MPSC विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार / MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; राहुल गांधी ही उपस्थित राहण्याची शक्यता
    error: Content is protected !!