जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात आता विभागीय आयुक्तांकडे अपील; नवीन अपीलेट प्राधिकरणाची निर्मिती

जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात आता विभागीय आयुक्तांकडे अपील; नवीन अपीलेट प्राधिकरणाची निर्मिती

पुणे : जात पडताळणी समित्यांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी आता आणखी एक अपीलेट प्राधिकरण उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसंदर्भातील कायद्यात केलेल्या सुधारणेनुसार, जिल्हा जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात संबंधित विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार आहे. त्यामुळे अर्जदार तसेच जात प्रमाणपत्राबाबत तक्रार करणाऱ्या तक्रारदारांना थेट उच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

यापूर्वी जिल्हा जात पडताळणी समितीने एखाद्या प्रकरणात जात वैधता प्रमाणपत्र मंजूर केले किंवा अर्ज फेटाळला, तर संबंधित निर्णयाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध होता. मात्र, नव्या सुधारणेमुळे समितीच्या निर्णयाविरोधात प्रथम विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे.

या निर्णयाचे  स्वागत करताना  ॲड. मंगेश ससाणे म्हणाले, “जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी आणखी एक प्राधिकरण निर्माण झाले आहे. प्रत्येक विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात अपील करता येणार आहे. यासंदर्भात आमची अनेक दिवसांपासून मागणी होती.”

ते पुढे म्हणाले, “या निर्णयामुळे अर्जदार आणि तक्रारदार या दोघांनाही थेट उच्च न्यायालयात जाण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. त्यामुळे हा निर्णय अर्जदारांसाठीही चांगला आहे आणि बोगस जात प्रमाणपत्रांविरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदारांसाठीही महत्त्वाचा आहे.”

जात प्रमाणपत्राच्या वैधतेशी संबंधित प्रकरणांमध्ये अनेकदा न्यायालयीन लढाईचा खर्च आणि कालावधी मोठा असतो. अशा परिस्थितीत विभागीय आयुक्तांच्या स्तरावर अपीलची संधी उपलब्ध झाल्यामुळे संबंधितांना प्रशासकीय पातळीवरच पुनर्विचाराची संधी मिळणार आहे.

“बोगस जात प्रमाणपत्रांच्या प्रकरणांकडे शासनाचेही लक्ष जात असून, अशा प्रकारे दाखले कसे मिळवले जात आहेत, याबाबत शासनाला आता अधिक गांभीर्याने विचार करावा लागत आहे,” असेही ॲड. ससाणे यांनी नमूद केले.

See also  बार्टीच्या जाचक अटींविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे निवेदन; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्तक्षेपाचे आश्वासन

नवीन अपीलेट यंत्रणेमुळे जात पडताळणी प्रक्रियेत अर्जदारांचे हित जपण्यासोबतच संशयास्पद किंवा बोगस जात प्रमाणपत्रांविरोधात तक्रार करणाऱ्यांनाही प्रभावी दाद मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!