लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पिंपरी-चिंचवड |

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच ९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय, नवी सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि “शिक्षणातून परिवर्तन” हा विचार समाजात रुजविणे हा होता.

या कार्यक्रमाला प्रा. डॉ. एस. एन. पठाण सर (माजी कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांच्यासोबत डॉ. धम्मरत्न शक्तिगुप्त गायकवाड (युवक शहराध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले, पिंपरी-चिंचवड) आणि महेश भागवत (अध्यक्ष, सांगवी विकास मंच) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच कार्यक्रमाला रवी डोंगरे, गोरख ब्राम्हणे, शांताराम निकाळजे, राजेश सरतापे, बाळासाहेब पिल्लेवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. जालिंदर सरवदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित व गरजू घटकांना सक्षम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मगन सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयश्री लांघी मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप शेलार, गुब गायकवाड, सुरेंद्र जाधव आणि अशोक बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले. तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालयाच्या वतीने भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

See also  बार्टीच्या जाचक अटींविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे निवेदन; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्तक्षेपाचे आश्वासन
  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!