३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

मुंबई, दि. ३० सप्टेंबर २०२६ : महात्मा फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून तो उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

या समता भवनांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाची राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय कार्यालये तसेच अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहतील. त्याचबरोबर इतर मागास वित्त महामंडळ, महाज्योती आणि बार्टीसारख्या संस्थांची प्रशासकीय कार्यालयेही या संकुलात ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

प्रस्तावानुसार, राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मुला-मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृहांचाही या उपक्रमात समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागाच्या विविध योजना आणि प्रशासकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

२,४६० कोटींचा अंदाजित खर्च

प्रस्तावातील अंदाजानुसार, या बांधकामांसाठी एकूण २,४६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे येथील मुख्य कार्यालयासाठी १०० कोटी रुपये, पाच विभागीय कार्यालयांसाठी प्रत्येकी ४० कोटी म्हणजे २०० कोटी रुपये आणि ३० जिल्हा कार्यालयांसाठी प्रत्येकी ३० कोटी म्हणजे ९०० कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे.

तसेच ३६ ओबीसी शासकीय मुलींच्या वसतिगृहांसाठी प्रत्येकी २० कोटी रुपये, तर ३६ ओबीसी शासकीय मुलांच्या वसतिगृहांसाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमूद आहे. या सर्व बाबींची एकत्रित अंदाजित किंमत २,४६० कोटी रुपये आहे.

See also  पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

तीन टप्प्यांत निधीची मागणी

या बांधकामांसाठीचा निधी दोन वर्षांत तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ८६० कोटी, १,००० कोटी आणि ६०० कोटी रुपये, अशा स्वरूपात निधी देण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय राज्यात दहा ठिकाणी मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहे, कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांच्या बांधकामासाठी मागील तीन वर्षांत नियोजन विभागाने शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त ३६ जिल्ह्यांत ‘समता भवन’ उभारण्याची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

  • Related Posts

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग महाज्योतीचे प्रादेशिक कार्यालय, वसतिगृह, ग्रंथालयासह भव्य संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : पुण्यातील शिवाजीनगर-वाकडेवाडी…

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना जळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसोबतच त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता, प्रतिभा आणि जिद्दीला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी NSUI जळगाव जिल्ह्याच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    Against  Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

    Against  Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

    विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

    विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

    MPSC विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार / MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; राहुल गांधी ही उपस्थित राहण्याची शक्यता

    MPSC विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार / MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; राहुल गांधी ही उपस्थित राहण्याची शक्यता
    error: Content is protected !!