NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

जळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसोबतच त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता, प्रतिभा आणि जिद्दीला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी NSUI जळगाव जिल्ह्याच्या वतीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध भागांतील महिला कबड्डी खेळाडूंना एकत्रित करून NSUIच्या बॅनरखाली जळगाव जिल्ह्याची मुलींची कबड्डी टीम प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाली आहे.

भंडारा–गोंदिया येथे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याची ही टीम आज जळगाव येथून उत्साहात रवाना झाली. यावेळी खेळाडूंसोबत त्यांचे प्रशिक्षक, पालक तसेच NSUIचे पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या मुलींना राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळत असल्याबद्दल पालकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.

या संघात रोशनी पाटील, मानसी पवार, शुभांगी ठाकरे, भूमिका सैंदाणे, नेहा भादले, दिपाली पाटील, अस्मिरा शेख, गायत्री पाटील, सेजल ठाकूर आणि मयुरी पवार या खेळाडूंचा सहभाग आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक राकेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

यावेळी बोलताना NSUI जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करताना त्यांच्या स्वप्नांना बळ देणे हीदेखील आमची जबाबदारी आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, यासाठी NSUI सातत्याने प्रयत्नशील राहील. जळगावच्या या लेकींनी राज्यस्तरावर आपल्या खेळाची छाप पाडावी, यासाठी NSUI सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”

खेळाडूंच्या भंडारा येथील निवास व भोजनाची व्यवस्था NSUIचे प्रदेश महासचिव अक्षत नंदरधने यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंना स्पर्धेदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

See also  संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या शिष्टमंडळाची समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या सोबत चर्चा

टीमच्या रवाना प्रसंगी निखिल पाटील, महेंद्र पवार, ऋषिकेश जाधव, NSUI अमळनेर तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव आणि प्रवीण पाटील यांच्यासह NSUIचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगावच्या क्रीडा क्षेत्रातील मुलींना नवे व्यासपीठ मिळवून देण्याच्या या उपक्रमाचे पालक व क्रीडाप्रेमींनी स्वागत केले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झालेल्या संपूर्ण संघाला शुभेच्छा देण्यात आल्या

–ॲड. कौस्तुभ पाटील,जिल्हाध्यक्ष – NSUI, जळगाव

  • Related Posts

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग महाज्योतीचे प्रादेशिक कार्यालय, वसतिगृह, ग्रंथालयासह भव्य संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : पुण्यातील शिवाजीनगर-वाकडेवाडी…

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी मुंबई, दि. ३० सप्टेंबर २०२६ : महात्मा फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर इतर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    Against  Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

    Against  Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

    विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

    विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

    MPSC विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार / MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; राहुल गांधी ही उपस्थित राहण्याची शक्यता

    MPSC विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार / MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; राहुल गांधी ही उपस्थित राहण्याची शक्यता
    error: Content is protected !!