विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा ; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश; भोजनगृहाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी समिती गठीत

पुणे, दि. २७ सप्टेंबर  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भोजनगृहाच्या दरवाढीचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने अखेर रद्द केला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून पुढील महिन्यापासून लागू होणारी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय २६ सप्टेंबर रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचे विद्यापीठाच्या जाहीर प्रकटनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भोजनगृहातील वाढीव दरांचा भार विद्यार्थ्यांवर पडणार नाही.

विद्यापीठाने यापूर्वी १७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार भोजनगृहाच्या दरात सुधारणा केली होती. या दरवाढीबाबत विविध विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप नोंदवून फेरविचाराची मागणी करण्यात आली होती.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही या प्रश्नावर पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष आकाशदादा झांबरे आणि प्रदेशाध्यक्ष चिन्मयदादा गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन भोजन शुल्कातील वाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

गुणवत्ता सुधारण्यासाठी समिती गठीत

दरवाढ रद्द करण्याबरोबरच भोजनगृहातील उपाहारगृहांची गुणवत्ता आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. जोत्स्ना एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या जाहीर प्रकटनात नमूद आहे. भोजनगृहाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम समितीमार्फत केले जाणार आहे.

विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रतिनिधी गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले आहे.

“भोजनगृहाची दरवाढ रद्द होणे हा सामान्य विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय आहे. विद्यार्थ्यांच्या भोजनाचा दर्जा आणि इतर पायाभूत सुविधांबाबत यापुढेही प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल,”

सोमनाथ लोहार, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस 

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप परिसराचे नामांतर होणार नाहीच; मंत्री छगनराव भुजबळ यांची जाहीर सभेतील मागणी मुख्यमंत्र्यांनी केली तात्काळ मान्य
  • Related Posts

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग महाज्योतीचे प्रादेशिक कार्यालय, वसतिगृह, ग्रंथालयासह भव्य संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : पुण्यातील शिवाजीनगर-वाकडेवाडी…

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना जळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसोबतच त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता, प्रतिभा आणि जिद्दीला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी NSUI जळगाव जिल्ह्याच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    ३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी

    Against  Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

    Against  Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

    विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

    विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

    MPSC विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार / MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; राहुल गांधी ही उपस्थित राहण्याची शक्यता

    MPSC विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार / MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; राहुल गांधी ही उपस्थित राहण्याची शक्यता
    error: Content is protected !!