चैतन्यमयी वातावरणनिर्मितीचा राजा असलेला श्रावण प्रत्येकाच्या मनामनात आनंदाची भरभरून पेरणी करतो -डाॅ.पराग काळकर

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा- डॉ. पराग काळकर

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे… बालकवींनी या गीतातून वर्णन केलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा पाचूसारखा हिरवागार महिना आहे. भारतीय वर्षगणनेतील या पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणूनच या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे.

श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन! हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. श्रावणातील संध्याकाळी, मावळत्या सूर्याला निरोप देणारे ढग विविध रंगांनी नटूनथटून पश्चिमेच्या क्षितिजापाशी गोळा होतात. सूर्यबिंबाला त्यावेळी सौम्य, शांत अशी वेगळीच रुपेरी झळाळी प्राप्त झालेली असते. या सृष्टिसौंदर्याच्या मोहातूनच कविवर्य मंगेश पाडगावकरांनी “श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा… उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा” असे यथार्थ वर्णन केले आहे.

मनामनात उत्साह, आनंद भरून टाकणारा! रोजच्या रूटीनमय जगण्याचा सोहळा करणारा! डोंगरवाटांमधून भटकंतीची साद घालणारा! हसवणारा, नाचवणारा श्रावण… तुम्हीही अनुभवली असतील अशी श्रावणाची विविध रूपे. श्रावण मास म्हणजे एक अद्भुत निसर्गदत्त देणगी! श्रावणात निसर्गाचे रूप चैतन्याचे लेणे लेवून दिवसागणिक विलोभनीय बनते. एकामागून एक येणाऱ्या पारंपरिक सणांची मालिकाच हा श्रावण मास घेऊन येतो.

चैतन्यमयी वातावरणनिर्मितीचा राजा असलेला श्रावण प्रत्येकाच्या मनामनात आनंदाची भरभरून पेरणी करतो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “हासरा, नाचरा, जरासा लाजरा… सुंदर साजिरा श्रावण आला.”

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत) फोटो सौजन्य: गुगल फोटो

  • Related Posts

    ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीच्या मिटींगला अखेर मिळाली तारीख; आता मंगळवारी 1 सप्टेंबर चा मुहूर्त जाहीर

    ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीच्या मिटींगला अखेर मिळाली तारीख; आता मंगळवारी 1 सप्टेंबर चा मुहूर्त जाहीर महाज्योतीला नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मुलींच्या प्रशिक्षण केंद्रासाठी जागा  See Alsoअमरावतीच्या सायलीची…

    ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीच्या मिटींगांना तारीख पे तारीख ; फक्त दोन मिटींगा; ओबीसी विद्यार्थ्यांचे, महाज्योतीचे व वसतीगृहांचे सारे प्रश्र्न रेंगाळले, ओबीसी समाज घटकांमधे रोष

    ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीच्या मिटींगांना तारीख पे तारीख अगोदरच मिटींगा झाल्यात कमी, त्यातही आता दोन मिटींगा ऐन वेळी केल्यात रद्द, ओबीसी विद्यार्थ्यांचे, महाज्योतीचे व वसतीगृहांचे सारे प्रश्र्न रेंगाळले, ओबीसी समाज घटकांमधे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!